मी मराठी

Posted by admin on February 23rd, 2011 filed in Poems

मी
तुमच्या मनातल्या भावना इतरांपर्यंत, अगदी सहजतेने पोचविणारी!

मी
खुद्द समृद्धीची जननी आणि संस्कृत माझी आदरणीय आई!

मी
वर्हाडी, खानदेशी, अहिराणी, कोकणी,
जाडीबोली, वाडवली आणि सामवेदी, यांची भगिनी!

मी
१५०० या वयोगटात मानली जाणारी, विवेकसिंधू माझी सगळ्यात जुनी साहित्यकृती!

मी
माझ्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी,
भगवद गीता तुमच्यापर्यंत पोचवली!

मी
मला प्रतिष्ठा मिळवून दिली ती शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवहार कोषानी !

मी
अंगाईगीते, अभंगवाणी, पोवाडे, ओवी, आख्यान आणि लावणी,
यांच्यातून झळकणारी !

मी
माझ्या प्रत्येक मराठी लेकराच्या हृदयात अभिमानाने वसणारी,
तुम्हा सर्वांची लाडकी, माय मराठी!

………..

गौरी कोतवाल-पांडे


3 Responses to “मी मराठी”

  1. Prerana Says:

    very well written! such words wouldn’t even occur to me!

  2. kiran khalatkar Says:

    tuzya avajat aiknyachi khup itcha ahe. internet mule kharach marathi prat jomane phophavel.

  3. Deep Says:

    No updates since long… waiting for next venture :)

Leave a Comment