कॉलेज कट्टा

Posted by admin on March 3rd, 2010 filed in Poems

स्वप्नात माझ्या काल कॉलेजचा कट्टा आला..
सर्व प्रथम अण्णाच्या टपरीचा  गर्मा-गरम वडा दिसला.
तोड नव्हती त्या चवीला कशाची..
आणि साथ होती न संपणाऱ्या गप्पांची .

नकळत मग पाऊले वर्गाकडे निघाली,
आणि वर्गाकडे जाणाऱ्या
जिन्यावर जाऊन अडखळली ..
कधीतरी तिथे बसून ‘assignment’ चे कागद खरडण्यात वेळ गेला
आणि कधीतरी परीक्षे नंतर पेपर ‘discuss’
करण्यात वेळ घालवला

पुढे जाऊन मी आमच्या वर्गात डोकावले..
गंमतीशीर ते, शेवटचे
बाकड़े दृष्टीस पडले.
अरे! आत्ता तर वर्गात सगळी हजर होती..
हजेरी नंतर निम्मी बाहेर सटकती.

सरांच्या  हि गोष्ट लक्ष्यात का येणार नव्हती?
त्यांनी सुद्धा मग दोनदा हजेरीची प्रथा पाडली..
वर्गात बराच वेळ रेंगाळले,
कारण तिथे आठवणींचे बरेच धागे उसवले..

कधी आवडत्या सरांचे ‘lecture’..
तर कधी नावडत्या सरांचा ‘anger’..
कधी वार्षिक समारंभाचे ‘preparation’..
तर कधी प्रचंड गडबडीत करा ’submission’..

“सर, आज तरी आमचा प्रोजेक्ट ’submit’ करून घ्या!!”
“हा पहा मुलांनो.. इलेक्ट्रोनिक प्रोजेक्टच्या नावाखाली, बाळाचा खुळखुळा “..
“सर मार्कं कमी दिले तरी चालतील, पण घ्या..”
छे हो कोतवाल - इथे नको!! वर्गाबाहेर जाऊन पसरा गळा!!…

सर असं बोलले  आणि दचकन जाग आली..
आमचे हे घोरत होते आणि मी घाबरून कूस बदलली.
कडू गोड मालिकांचा असा हा
अनमोल साठा..
प्रत्येकाच्या आठवणीतला कॉलेज कट्टा.

गौरी कोतवाल-पांडे ०१-०३-२०१०


5 Responses to “कॉलेज कट्टा”

  1. kiran khalatkar Says:

    tuzyasarkhich bolaki kavita !

  2. Mak Says:

    awesome! you rock! :)

  3. Prerana Says:

    are waa! ek se badhkar ek kavita.. Good job. Remembered my college katta days too :)

  4. Dattaraj Says:

    Barobar aahe….
    Zakkas Kavita!

  5. admin Says:

    धन्यवाद!

Leave a Comment