एक टुमदार घर असावं

Posted by admin on August 21st, 2009 filed in Poems

एकदा मी आमच्या ह्यांना मोठ्या कौतुकाने म्हणले … “आहो माझी कविता ऐकता का?”

उत्तर मिळालं, “अरे वा!!! .. आमचं नशीबच म्हणायचं “

“इश्श .. आहो आधी ऐका तर खारं “…

एक टुमदार घर असावं
त्याला लागून बगीचा,
एक आरामशीर झोका
ज्यावर बसून सुचतील कविता..

बगीच्यात आपल्या
सिनेमातल्या सारखी छत्री,
संध्याकाळचा खाऊ खायला
अशीच जागा बरी..

खास एक खिड़की
त्याला मुलायम पडदा,
खिडकित बसून
पहु पावसाळ्याचा नजराणा..

देवघर आपलं
शांततेचा प्रतिक,
सर्वांचे नमस्कार
इश्वाराला समर्पित..

ड्रोइंग रूम मधे
करू गेस्ट ला वेलकम,
तिथे नको मला
टीवी ची अड़चण..

टीवी साठी एक मोठा
हाँल आपल्याला हवा,
पॉप-कोर्न खात घेऊ
मोठ्या स्क्रीन ची मजा..

एका खोलीत मात्र
सितार पेटी तबला,
संगीताच्या माध्यमातून
जोपासू घराण्याची परंपरा..

स्वयंपाक घरात आपल्या
बनतील एक से एक पदार्थ,
तब्बेत ठंठणीत हवी
त्यातच खरा जीवनाचा सार्थ..

दररोज व्यायामाला
स्फूर्ति तर हवीच,
त्याचबरोबर सेपरेट
खोली सुद्धा हवी..

नाहणीघरत आमच्या ह्यांना
बाथ-टब हवा,
मेकप साठी मला
नक्षी असलेला आरसा..

एका खोलीत करेन
मेडिटेशन आणि योगासन,
तिथे नको मला
कोणाचा डिसटरबंस..

प्रशस्थ गच्चीत
घेऊ सर्व रुतुंची मजा,
पौर्णिमेच्या चांदण्यात
तारकांशी गप्पा..

नको ते सामान दडपायला
स्टोर रूम हावी,
घराची साफ़-सफाई
मग किती किती सोपी..

सगळ आहे परफेक्ट
करू स्विमिंगपूलच अँडीशन,
मजा येइल भारी
नको सबस्ट्रैकशन ..

“किती छान कल्पना आहे, नाही का ? या कवितेचा शेवट कसा करू?”.. मी

“ऐक..” आमचे हे बोलले …

“मीच तुझी कविता पूर्ण करतो “

“नीट कान देऊन ऐक.. बाघ कशी मस्त RHYME  करतो “

घरात अश्या
नाही दुखांना जागा,
वाट कोणाची पाहता
चला बँक लुटायला..

:)

गौरी कोतवाल-पांडे २०-०८-२००९



10 Responses to “एक टुमदार घर असावं”

  1. Somesh Says:

    are waa…ha tuza dusra blog na..?? chan aahe..aani concept+theme pan mast aahe…keep posting… :)

  2. Rahul Says:

    Good poem, Gauri.
    Is the last stanza really from Nikhil?

  3. Prerana Says:

    Really nice poem and a lovely picture to match with it too !! Keep it up.
    You are really an artist at heart and I think you have inherited lots from your mom and Jiji Atya.
    Love.

  4. Makarand Says:

    zhakkas ! The ending was completely unexpected ;)

  5. kiran khalatkar Says:

    Very nice poem! Eager to see your new home!

  6. admin Says:

    hehe.. the last line explains all ..

    @Rahul : The last para is partially from Nikhil.. Partially because I read his mind you know ;-)

    Thanks all for the comments and thus motivation..

  7. Deepak Ingle Says:

    Fantabulous..! :)

  8. Bhushan Says:

    Khadi Nighaych??????????

    Bank Lutayla???????

  9. Sateja Says:

    too good..mala pan hvae ase ek thumdar ghar have ;-) excellent poem..

  10. kiran khalatkar Says:

    Waiting eagerly for your next poem.

Leave a Comment