सवंगडी माझा
Posted by admin on February 18th, 2010 filed in Poems
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
शाळेत याचा ‘Nursery’ साठी ‘Interview’
याचा नंबर आला आणि नेमका याला हवा खाऊ
आई बाबा हैराण याच्या तोंडाला नाही मटट
‘Admission’ मिळव बाबा पुरवू ‘Ice-cream’ चा हट्ट
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
खेळातली नवीन गाड़ी आणून द्यायचा अवकाश
गोल गोल स्वतःभवती फिरवून केलास का सत्यानाश ?
मामाच्या गावी गेलो तरी लुडबुड याची चालू
दुपारच थोडा वेळ झोपू दे, टवाळक्या नको करू
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
वर्गात माझ्या नव्हता तरी लक्ष्य याच्याकडे असायचा
शिक्षा ह्याला व्हायची आणि डोळ्यात पाणी माझ्या यायच
देशभक्तिपर गीत याचं मी कान देऊन ऐकायचे
‘Football’ ची ‘Match’ सुद्धा अगदी टक लावून पहायचे
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
अचानक एक दिवस अल्लड़पणा नाहीसा झाला
‘Steering’ हातात मीळ्ताच चौथ्या ‘Gear’ वर गाड़ी आली चालवायला
समजूतदार झाला आहे हुशारीच्या गोष्टी करतो
महत्वाची कामे उत्तम रित्या पार पाडतो
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
सोबत खेळलो, धडपडलो, बागडलो, भांडलो
तरी सुद्धा गट्टी जमायला कधीतरी वेळ लागतो
मोठा माणुस झालास की विसरून नको जाऊ
तो पहा ऐटित चले माझा ‘Handsome’ भाऊ
सवंगडी माझा बालपणीचा हा,
नक्की कोण हा खट्यळ समजलच असेल तुम्हाला
गौरी कोतवाल-पांडे १८-०२-२०१०

February 18th, 2010 at 10:42 am
waaaa…..zakass aahe ekdum….lai bhaari…
February 19th, 2010 at 12:17 am
ati sundar ..!
February 19th, 2010 at 9:36 am
Very well written. I am sure Gaurav must be so proud of his big sister that she can express herself in such beautiful poetry - not everyone can do that!
February 19th, 2010 at 9:30 pm
Khup chaan!!!!
February 20th, 2010 at 5:15 am
Very sweet and touching too!
February 22nd, 2010 at 11:24 am
Mastach…keep it up…we want to read more from you