का सारखा तुझा भास्?

Posted by admin on June 17th, 2009 filed in Poems

हलकेच पचोळ्याच आवाज  होतो..
तुझी चाहूल लगते
तू दिसला नाहीस की खूप उदास वाटतं
अखंड जग जरी सोबतीला असल
तरी सुद्धा अगदी एकट
का सारखा तुझा आभास?

एकटी असले तरी तुझाच विचार करते
तुझ्यावरच कविता सुचते
तू आला नाहीस लवकर की मन बेचैन होतं
पुस्तकांचा ढीग जरी सोबत असला
तरीसुद्धा लक्ष्य तुझ्याकडे असतं
का नेहमीच तुझ्याकडे वाट?

रुसतोस तू माझ्यावर जेव्हा
गळून जाते, दोर तुटलेल्या पतंगासरखी
माझच  मन मला खातं
तू धावत येउन मिठीत घ्यावस
अस सारख वाटत राहतं
का निरंतर तुझीच आस?

त्या टेकडी जवळ्च्या डोहात जेव्हा
मी माझ प्रतिबिंबा पाहते
तू मागून माला बिलगलास असा भास होतो
नकळत चेहरयवरल  हसू पाहून
माझीच माला लाज वाटते
का सारखा तुझा भास्?


गौरी कोतवाल-पांडे १७-०६-२००९


4 Responses to “का सारखा तुझा भास्?”

  1. Bhaskar Says:

    Amazing kavita…..khop chaan

  2. Dattaraj Says:

    koopach chaan….sahi

  3. nitin Says:

    very nice so pls writing more poem

  4. manisha pande nagpur. Says:

    marvelous.

Leave a Comment